पुणे : लॉकडाऊनमुळे दीर्घकाळ नागरिकांना घरातच रहावे लागले होते. नोकरी आणि रोजगार थांबल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. या कठीण काळात जगायचे कसे? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत असताना. महावितरणने मीटर रिडींग न घेताच सर्वसामान्यांना भरमसाठ बीले पाठविले आहेत. त्यामुळे कोरोना परिस्थितीचे गांभिर्य ओळखून ही बीले माफ करण्यात यावीत. अशी मागणी शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी महावितरणकडे निवेदन देऊन केली.
राज्य सरकारने कोरोना काळात ग्राहकांना अधिकचे वीज बील येणार नसल्याची घोषणा केली होती. तरी मागील महिन्याचे भरमसाठ रक्कमेचे वीज बीले सर्वसामान्यांना आली आहेत. नुकतेच रोजगाराला प्रारंभ झाला आहे. अद्यापही सर्वसामान्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज बील माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तसेच सप्टेंबर महिन्यापासूनचे बील द्यावे. अशी मागणी बागवे यांनी महावितरणच्या पद्मावती भागाचे कार्याकारी अभियंत्याकडे केली.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, रवी ननावरे, द.स. पोळेकर, बंडू नलावडे, सीमा महाडिक, भरत सुराणा, हरिदास चव्हाण, केतन जाधव, महेश गायकवाड, कृष्णा सोनकांबळे, नरसिंह आंदोली, विठ्ठल गायकवाड, सुरेश चौधरी, प्रकाश आरणे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा