रेडीरेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडीरेकनर) दरात राज्यात सर्वाधिक वाढ पुण्यात केली आहे. या दरात शहरात 1.56 टक्के वाढ झाल्याने मध्यवर्ती भाग आणि उपनगरांमधील सदनिकांचे भाव चढेच राहणार आहेत. परिणामी पुण्यात हक्काचे घर आवाक्याबाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हे वाढीव दर नुकतेच लागू झाले आहेत.

शहराच्या मूळ हद्दीत 1.25 टक्के आणि विस्तारित हद्दीसाठी 1.88 टक्के अशी शहरात सरासरी 1.56 टक्के वाढ झाली आहे. परिणामी शहराच्या सर्वच भागात रेडीरेकनरचे दर वाढले आहेत. कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता या ठिकाणी नेहमीच रेडीरेकनरचे दर सर्वाधिक असतात. या ठिकाणी हा दर अनुक्रमे 14 हजार 580 आणि 13 हजार 167 प्रति चौरस फूटपर्यंत पोहोचला आहे. कोरेगाव पार्क रस्त्यावरील रेल्वे ओलांडणी पूल ते बंडगार्डन पुलापर्यंतचा परिसर शहरातील सर्वाधिक महाग परिसर आहे. तर, प्रभात रस्त्यावरील ज्ञानकोशकार केतकर रस्ता (आयकर रस्ता) हा भाग दुसर्‍या क्रमांकाचा महाग परिसर आहे. याशिवाय ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्त्याला जोडणारा रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, डॉ. केतकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, बोट क्लब रस्ता, नॉर्थ मेन रोड ते भैरोबा पंपिंग स्टेशन, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि आयडियल कॉलनी हे परिसर देखील महागडे झाले आहेत.

दरम्यान, मध्यवर्ती पेठांमध्ये सदाशिव आणि नवी पेठेत प्रति चौ. फूट दर 9879 रुपये करण्यात आला आहे. नारायण पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ आणि शुक्रवार पेठ या भागातील दर सरासरी आठ हजार रुपये प्रति चौ. फूट झाले आहेत. अन्य पेठांपैकी रविवार पेठेत 7337 रुपये, गणेश पेठ 6287 रुपये, मंगळवार पेठ 6842 रुपये, सोमवार पेठ 7026 रुपये, रास्ता पेठ 6191 रुपये, नाना पेठ 6398 रुपये आणि भवानी पेठ 7541 रुपये असे झाले आहेत. तर, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेले येवलेवाडी, उंड्री, आंबेगाव बु., फुरसुंगी या भागात सरासरी तीन ते चार हजार रुपये प्रति चौ.फूट दर झाले आहेत. अन्य प्रमुख भागांमधील सदनिकांसाठी रेडीरेकनरचे दर (चौ. फुटांमध्ये)

हिंगणे खुर्द (6,324), वडगाव बु. (6,736), धायरी (5,258), कात्रज (6,393), कोंढवा खु. (6,435), हडपसर (8,274), बाणेर (8,500), बालेवाडी (7,464), पाषाण (8,477), सहकारनगर (8,941), वारजे (6,986).

मध्यवर्ती भागातील सदनिकांसाठी रेडीरेकनरचे दर (चौ.फुटांमध्ये)

सदाशिव पेठ, नवी पेठ आणि दत्तवाडी (9,879), शनिवार पेठ (8,026), शुक्रवार पेठ (8,088), कसबा पेठ (6,887), नारायण पेठ (8638), बुधवार पेठ, लक्ष्मी रस्ता (8090), रविवार पेठ (7,337), गणेश पेठ (6,287), मंगळवार पेठ (6,842), सोमवार पेठ (7,026), रास्ता पेठ (6,191), नाना पेठ (6,398), भवानी पेठ (7,541)

सर्वाधिक महाग भाग (दर चौ. फुटांमध्ये)जुने दरनवे दर
कोरेगाव पार्क रस्ता रेल्वे ओव्हर ब्रीज ते बंडगार्डन पूल13,72314,580
प्रभात रस्ता (आयकर रस्ता)12,99213,167
ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड यांना जोडणारा भाग10,98211,317
भांडारकर, विधी महाविद्याालय आणि डॉ. केतकर रस्ता10,99110,996
जंगली महाराज रस्ता10,68410,926
बोट क्लब रस्ता10,85510,860
नॉर्थ मेन रोड ते भैरोबा पंपिंग स्टेशन10,08610,767
कर्वे रस्ता10,64210,754
कॅनॉट रस्ता10,17210,686
फर्ग्युसन रस्ता10,41610,526
विद्यापीठ रस्ता10,06210,368
पौड फाटा ते आयडियल कॉलनी9,49210,371
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा