पुणे: शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना महिती मदत केंद्र उभारण्यात येत आहेत. पर्वती मतदारसंघामध्ये कोरोना मदत केंद्र मित्रमंडळ चौक याठिकाणी उभारण्यात आले असून उदघाटन राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते करण्यात आलेे.
यावेळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम, दिलीप अरुंदेकर, नगरसेवक प्रिया गदादे पाटील, सुभाष जगताप , शिवाजी गदादे पाटील, सुनील बिबवे, आनंद बाफना, संतोष नांगरे, मृणालिनी वाणी, अमोल ननावरे, शिल्पा भोसले, श्वेता होनराव कामठे, डॉ. सुनीता मोरे , अशोक राठी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांना मदत व्हावी योग्य पध्दतीने मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये मदत केंद्र उभारण्याच्या सुचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहे. यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे
यामार्फत कोविड हॉस्पिटलची अद्ययावत माहिती, टेस्टींगच्या सोयी, रुग्णवाहिका, समुपदेशन केंद्र , इतर वैद्यकीय सोयी आदींची माहीती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपणा कोरोना संदर्भात अडीअडचणी असल्यास याठिकाणी माहितीसाठी संपर्क साधावा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा