पुणे : पुण्यात बाधितांची संख्या वाढत आहे. दररोज बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. रविवारी दिवसभरात 1 हजार 978 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 587 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील चोवीस तासांत 63 रुग्णांचा मृत्यू झाला असून, तर 18 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुण्यात अत्यवस्थ रूग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. शहरात काल स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 6 हजार 770 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 1 हजार 978 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 19 हजार 657 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 17 हजार 778 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 910 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 440 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 470 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 2 हजार 793 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 99 हजार 76 झाली आहे.

पुणे विभागातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

जिल्हा रुग्ण  कोरोनामुक्त सक्रीय  मृत
पुणे  2,20,692  1,74,627  41,117  4,948
सातारा 22,863 14,567 7,672  624     
सांगली 22,306 12,376 9,109  821
सोलापूर 24,178 16,997 6,258  923
कोल्हापूर  33,886 22,111 10,747  1028
एकूण  3,23,925  2,40,678  75,903  8,344
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा