पुणे : पुण्यात बाधितांची संख्या वाढत आहे. दररोज बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सोमवारी दिवसभरात 1 हजार 938 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 573 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील चोवीस तासांत 59 रुग्णांचा मृत्यू झाला असून, तर 21 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुण्यात अत्यवस्थ रूग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. शहरात काल स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 6 हजार 588 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 1 हजार 938 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 15 हजार 770 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 17 हजार 39 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 917 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 470 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 447 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 2 हजार 706 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 96 हजार 25 झाली आहे.

पुणे विभागातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

जिल्हारुग्णकोरोनामुक्तसक्रीयमृत
पुणे2,11,2251,66,27440,1814,770
सातारा21,34713,0827,683582
सांगली20,43410,7478,925762
सोलापूर22,83016,2755,667888
कोल्हापूर31,83120,73910,107985
एकूण3,07,6672,27,11772,5637,987
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा