पिंपरी : महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर शेख यांच्या निधनाने राष्ट्रवादीला हा दुसरा धक्का बसला आहे. जावेद शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. आकुर्डी भागातून सलग तीनवेळा ते निवडून आले होते. 2007 च्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते. 2017 च्या निवडणुकीतही आकुर्डीतून शेख राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यांनी ‘अ’ प्रभागाचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. शेख यांना 16 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात उचार सुरु होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा