सोलापूर : महाविकास आघाडी सरकार हे मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून या सरकारमधील मंत्री झपाटलेल्या सिनेमातील कलाकार असून हे आपल्याच भातावर डाळ ओढण्याचे काम करीत आहेत’ अशी खरमरीत टीका महायुतीचे नेते आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा राजा पांडुरंग यांच्या प्रतिकात्मक मूर्तीस दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे आणि दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी दे बा…विठ्ठला असे म्हणत खोत यांनी पांडुरंगाच्या चरणी साकडं घातले.

‘राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळ गैरव्यवहारास हे सरकार पाठीशी घालत आहे. दुधाचे खासगी प्लांट हे सरकारच्या संबंधित असून दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा कमी आहे’ असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.दूध दर आंदोलनाची ठिणगी पंढरपूरमध्ये पडली असून काल रात्री पंढरपूर तालुक्यात रयत क्रांती संघटनेच्या वतीने रस्त्यावर टायर जाळून या आंदोलनाची सुरू केली तर आज पहाटे माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी चंद्रभागा पात्रात विठ्ठलाच्या मूर्तीस दुग्धाभिषेक घातला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा