नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचा वयाच्या ६४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. अमर सिंह यांनी उपचारासाठी सिंगापूरमध्ये होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचे आजपर्यंत महत्व टिकून आहे. अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा