पुणे : पुण्यात दिवसागणिक दीडहजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यूचे सत्रदेखील कायम आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. शनिवारी 1 हजार 506 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 1 हजार 791 जण कोरोनामुक्त  झाले आहेत. मागील  चोविस तासात 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

                शहरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणदेखील वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 55 हजार 761 वर पोहोचली.  शहरातील विविध रुग्णालयात 17 हजार 512 रुग्ण उपचार घेत आहेत.                               विविध रुग्णालयात 638 रुग्ण अत्यवस्थ असून मागील चोविस तासात एकूण 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 389 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 249 रुग्ण अतिदक्षात विभागात उपचार घेत आहेत.

 कोरोनामुळे मृत्यूूंची संख्या 1 हजार 335 वर पोहोचली आहे. आजपर्यंत आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 36 हजार 914 झाली आहे.  दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण 5 हजार 873 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा