पिंपरी : कोरोनामुळे रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला, उबेर व जुगनू यासारख्या खासगी कंपन्या बंद करून सरकारने स्वतः त्याच धर्तीवर ऍप सुरु करावे, अशी मागणी क्रांती रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर काळे यांनी केली आहे. त्याबाबत आकुर्डी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे, असे असताना रिक्षाचालकांने घर कसे चालवायचे असा प्रश्न आहे. अनेक रिक्षा संघटनांनी रिक्षाचालकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती. रिक्षाचालकांना सरकाने अर्थिक पॅकेज जाहीर करावे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा