श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधून ३७० वे कलम हटविल्यापासून मेहबूबा नजरकैदेत आहेत. मे महिन्यात त्यांची नजरकैद तीन महिन्यांनी वाढविली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मेहबूबा यांना तात्पुरत्या कारागृहातून त्यांच्या घरी हलविण्यात आले होते.

दरम्यान, पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन यांची सरकारने सुटका केली आहे. सज्जाद यांनाही मागच्या वर्षी ऑगस्टपासून ताब्यात घेण्यात आले होते. सज्जाद यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. मी आता स्वतंत्र आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची आधीच सुटका झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा