केजरीवालांच्या निर्णयाला नायब राज्यपालांची स्थगिती

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आम आदमी पक्षाला आणखी एक झटका दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘अनलॉक-3’ मध्ये हॉटेल आणि प्रायोगिक तत्वावर आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नायब राज्यपालांनी त्यास स्थगिती दिली आहे. कोरोनामुळे परिस्थिती नाजूक बनली असून धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नायब राज्यपालांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.

केजरीवाल यांनी गुरूवारी अनलॉक-3 ची नियमावली जारी केली होती. त्यात 1 ऑगस्टपासून हॉटेल आणि प्रायोगिक तत्वावर सात दिवस आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली होती. अर्थव्यवस्थेला गती मिळावी, यासाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार व्यायामशाळांना परवानगी देण्यात आली आहे.तसेच, रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे. दुसरीकडे, देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा