जयपूर : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची परवानगी राज्यपालांनी दिली आहे.आता गेहलोत यांना आमदारांना सांभाळायची म्हणजे घोडेबाजारापासून वाचविण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे गेहलोत यांनी सर्व आमदारांना विशेष विमानाने जैसलमेरला हलवले आहे.

मागच्या काही दिवसांपासून हे सर्व आमदार जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दरम्यान, भाजपकडून घोडेबाजार केला जात असून आमदारांना १० ते १५ कोटींचे आमिष दाखविले जात असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला होता. विधानसभेचे २०० सदस्य असून बहुमताचा जादुई आकडा १०१ आहे. सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा दावा केला आहे.

विधानसभा अध्यक्षांना नोटीस

जयपूर : राजस्तान उच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांना नोटीस बजावली आहे. बहुजन समाज पक्षाच्या 7 आमदारांच्या काँग्रेसमधील विलगीकरणावरुन विधानसभेच्या अध्यक्षांसह सचिवांना न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. तसेच, 11 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. या विलगीकरणाला भाजप आमदार मदन दिलावर आणि बहुजन समाज पक्षाने आव्हान दिले होते. दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष आणि अशोक गेहलोत यांच्या कथित चित्रफितीवरुन भाजपने अध्यक्ष जोशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त गेहलोत यांचे पुत्र वैभव यांनी भेट घेतली होती. त्यावेळी अध्यक्षांनी आणखी 30 जण बाहेर पडले असते तुम्ही सरकार वाचवू शकला नसता, असे यांनी म्हटले होते. या कथित चित्रफितीच्या आधारे भाजपने अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा