येरवडा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या यांच्या जन्मशताब्दी निमित्त राजकीय,सामाजिक,तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी येरवड्यातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुस्तके व सॅनिटायझर,मास्क,औषधे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.

कोरोनाची सावट असल्याने येरवडा परिसरातील अनेकांनी साध्या पध्दतीनेच अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी केली.प्रत्येक वर्षी येरवड्यातील स्मारक समितीच्या वतीने मोठ्या जयंती उत्सहात साजरी करत असतात.मात्र यंदा महामारीमुळे अगदी साध्या पध्दतीने साजरी केली, अभिवादनास येणार्‍या व्यक्तीस सॅनिटायझर वापर अनिवार्य केले होते. समितीचे अध्यक्ष रावसाहेब खंडागळे,उपाध्यक्ष सुनिल थोरात, कार्याध्यक्ष भैरवनाथ साळवी,प्रवक्ते रमेश सकट,उपसचिव अमर मांडलिक ,संजय वाल्हेकर,राजू जाधव,शाम सरोदे लक्ष्मण सरोदे,

शेषराव मंडलिक,शंकर शेलार, मनिष साबळे,यांनी अण्णांभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून सह्यांची मोहिम राबवून विविध उपक्रमाचे आयोजन केले.
अण्णांभाऊच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे.आमदार सुनिल टिंगरे, भाजप शहरध्यक्ष जगदिश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, गटनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक संजय भोसले,संतोष राजगुरू, गणेश ढोकले, विकास सोनवणे, यंशवंत देवकर, येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी विजय लांडगे,विजय वैराळ, युवक कॉँग्रेसचे विशाल मलके, अशोक जगताप,राष्ट्रवादी पक्षाच्या रेणूका चलवादी यांनी पुष्पहार अर्पण केला तर सामर्थ्य जनशक्ती संघटनेने स्वप्निल माने-पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून गरजू व गरिबांना विविध स्वरूपाची मदत केली, राष्ट्रीय परिवर्तन संघटनेचे सुखदेव उर्फअप्पा डावरे, सोमनाथभाऊ पानगावे युवा मंचाचे सतिश जाधव,समाधान जाधव तसेच संस्थापक अध्यक्ष सोमनाथ पानगावे यांनी कार्यालयातच लोकमान्य टिळक व अण्णांभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लोक विकास संघटनाचे संस्थापक भैरवनाथ उकारडे,छाया उकारडे,अभिजीत उकारडे,गोंविद म्हस्के,अंबादास दहिरे यांनी विविध उपक्रम राबवून शताब्दी साजरी केली.

रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र मोरे यांनी पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मनसेचे लक्ष्मण काते यांनी अण्णाभाऊ अभिवादन म्हणून फकीरा कांदबरी पुस्तकाचे मोफत वाटप केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा