आजाद प्रभाकर
संचालक,YES ‘India Can’,वर्धा

विस्तारवादी ब्रिटिश राजवटीत स्वदेशीच्या चळवळीला धार देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने दिला जाणारा लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड हा सन्मान, या वर्षी विस्तारवादी चीनला स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून आवाहन देणार्‍या सोनम वांगचुक यांना दिला जाणे, म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली आहे.

चीन भारताच्या सीमेवर आक्रमक होता क्षणीच, भारताकडून चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य कारवाईच्या सोबतच इचखउ नावाचा एक घातक वायरस सुद्धा भारतात तयार करण्यात आला. हा व्हायरस कोरोना पेक्षाही जास्त झपाट्याने पसरणारा होता. भारताने या वेगळ्या मारक शस्त्राचा वापर सुरु केल्यामुळे चीनच्या सरकारपासून व्यवसाय जगतात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. भारतीय सैन्यदलाच्या कारवाई सोबतच या व्हायरसने सुद्धा चीनला भारतीय सीमेवरून काढता पाय घेण्यासाठी भाग पाडले. आणि या व्हायरसचा शोधकर्ते होते जगातल्या सर्वात उंच वाळवंटात शैक्षणिक क्रांतीचे बीजारोपण करणारे आपले सोनम वांगचुक.

जेव्हा लडाखमध्ये पेंगोंग लेक, हॉट स्प्रिंग आणि गलवान घाटीत चीनच्या आक्रमक पवित्रा बद्दल वांगचुक यांना कळले. त्यांनी देशाच्या जनतेला आवाहन केले, सैन्य चीनला बुलेट पावर नी उत्तर देईल, मात्र आपणास चीनला वॉलेट पॉवर नी उत्तर द्यायला हवे. आणि इथून इेूलेीींं चरवश ळप उहळपर (इचखउ) वायरस त्यानिं जन्मी घातला. हा व्हायरस लगेच झपाट्याने सर्वीकडे पसरू लागला. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात चीनची घूसखोरी किती खोल पर्यंत आहे याची पूर्व कल्पना वांगचुक यांना होतीच. म्हणून चीनचे सॉफ्टवेअर एका आठवड्यात आणि हार्डवेअर एका वर्षात हद्दपार करण्याचे आव्हान त्यांनी भारतीय जनमानसाला केले.
बघता बघताच चीनचे अ‍ॅप भारतीयांच्या मोबाईलवरून गायब होऊ लागले. चायनीज Aििी ची रेटिंग घसरायला लागली. ज्यावेळी चीनच्या मुख्य वर्तमानपत्राच्या संपादकीयमधून सोनम वांगचुक यांच्या मोहिमेवर जोरदार टीका व्हायला लागली. या मोहिमेची फलश्रुतिच म्हणावी की भारत सरकारने आतापर्यंत 105 चिनी अ‍ॅप वर निर्बंध घातले आहे, तीनशेच्या जवळपास चीनचे अ‍ॅप सरकारच्या रडारवर आहे.

विस्तारवादी ब्रिटिश राजवटीत स्वदेशीच्या चळवळीला धार देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने दिला जाणारा लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड हा सन्मान, या वर्षी विस्तारवादी चीनला स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून आवाहन देणार्‍या सोनम वांगचुक यांना दिल्या जाणे, म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली आहे.

पण कोण हा सोनम वांगचुक जो हिमालयाच्या एका कोपर्‍यातून आवाज देतो आणि भारताचे कोट्यावधी तरुण त्याच्या हाकेला ओ देतात? वर्षानुवर्ष तेच जुने कपडे, जुने बूट, जुने स्वेटर घालणारा, सायकलवर हिमालय पालथा घालणारा हा अवलिया आहे तरी कोण.

1966 साली लडाख च्या उलीतोकपो गावात जन्मलेले वांगचुक यांनी वयाच्या नऊ वर्षापर्यंत शाळेचे तोंड सुद्धा बघितले नव्हते, घरी आईकडूनच शिक्षण मिळायचे, आणि वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी जेव्हा अधिकांश मुलांना त्यांच्या करिअरची दिशा सापडलेली नसते, अश्या तरुण वयात सोनम वांगचुक यांनी आपल्या मित्रांसोबत लडाखमध्ये पुढील शिक्षणाची दशा दिशा काय असावी ही ठरवणारी एक संस्था स्थापित केली र्डीींवशपीीं’ एर्वीलरींळेपरश्र रपव र्उीर्श्रीीींरश्र र्चेींशाशपीं ेष ङरवरज्ञह (डएउचजङ). त्यांच्या मते ते सर्व अनोळखी भाषेत दिल्या जाणार्‍या परग्रही शिक्षण पद्धतीचे बळी होते. ज्यामुळे अधिकांश स्थानिक विद्यार्थी नापास होत होते. आपल्या आदर्श शिक्षणाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी वांगचुक यांनी डएउचजङ चे कॅम्पस निर्माण केले. सर्व प्राकृतिक संसाधनानी निर्माण केलेल्या या शाळेच्या परिसरात स्वयंपाक, उष्णता किंवा प्रकशासाठी सुद्धा कुठल्याही फॉसिल फ्युल चा वापर होत नसून फक्त सूर्यप्रकाश आणि सौर उर्जेवर हा परिसर संचालित आहे. इथे शिक्षण मार्कशीट वर आकडे घडवायला नाही तर देशासाठी जबाबदार नागरिक घडवायला दिला जातो. या शाळेत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ आणि सरकार सुद्धा आहे. शाळेचे स्वतःचे वर्तमानपत्र आहे. इथे शिक्षण डोक्याला ताण देत नाही, तर मनाला कल्पनेचे पंख देतो.
त्यांच्या या उपक्रमाचे यश बघता जम्मू काश्मीरच्या राज्यसरकारने सुद्धा सरकारी शाळेचे शिक्षण दर्जा उंचावण्यासाठी वांगचुक यांना पाचारण केले. ऑपरेशन न्यू होप द्वारे त्यांनी ग्रामस्थ आणि स्थानिक संस्थांच्या मदतीने शालेय शिक्षणाला विद्यार्थ्यांसाठी सोपे आणि व्यावहारिक केले. लडाखच्या सांस्कृतिक आणि प्राकृतिक वारसा जपण्या मध्ये आणि पुढे नेण्यामध्ये सोनम वांगचुक यांनी मागील तीस वर्षात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. विविध सामाजिक संस्था आणि शासकीय विभाग यांना एका मंचावर आणून त्यांच्यात समन्वय स्थापित करण्यासाठी ते नेहमी धडपडत असतात.

कळारश्ररूरप ळपीींर्ळीीींंश ेष रश्रींशीपरींर्ळींशी नावाने वांगचुक एका आगळ्यावेगळ्या युनिव्हर्सिटी चे स्वप्न साकार करत आहेत, इथे अशा पद्धतीचे शिक्षण देण्याची त्यांची योजना आहे, ज्या माध्यमातून शिक्षण घेणार्‍या चे आजीविका आणि पर्यावरण दोघांचा शाश्वत विकास होईल. जरी हिमालयातून शेकडो नदयांचे उद्गम होत असलेले तरीही लडाख हा अत्यंत कमी पर्जन्यमान असणारा भूभाग आहे, आणि भौगोलिकदृष्ट्या पाण्याची साठवण सुद्धा अत्यंत कठीण आहे. ज्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात गावोगावी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न उपस्थित व्हायचे. या पारंपरिक समस्येवर अभिनव तोडगा म्हणून सोनम वांगचुक यांनी ’आईस स्तूपा’ ही संकल्पना शोधून काढली. हिवाळ्यात उंचीवरून वाहणार्‍या पाण्याचे कारंजी तयार करून त्याचे रूपांतरण बर्फात करायचे, यानी गावोगावी स्वतःचे ग्लेशियर निर्माण झाले. उन्हाळ्यात हेच ग्लेशियर वितळल्यामुळे तयार झालेले पाणी गावकर्‍यांची पाण्याची गरज भागवते.

2015 साली भूस्खलनामुळे लडाख मधील फुकताल नदी चे मार्ग अवरुद्ध झाले आणि 15 की मी लांब एक तळे तयार झाले, सोनम वांगचुक यांनी नदीचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासनाला भुक्षरण आणि सायफन सारख्या सौम्य पद्धती सुचवल्या, मात्र शासनाने त्यांचा सल्ला धुडकावून लावला आणि ब्लास्टिंग च्या माध्यमातून नदीचा मार्ग मोकळा करण्यात आला. मग काय अचानक आलेला पूराने बारा पूल वाहून नेले. नंतर सिक्किम मध्ये अष्याच एका उंचिवरिल तळ्याला खाली करण्यासाठी सोनम वांगचुक यांनी सुचवलेली पद्धत अवलंबिण्यात आली आणि कुठलेही नुकसान न होता तळे रिकामे करण्यात आले.

हिमालयावर अभ्यास करताना एक गोष्ट सोनम वांगचुक यांना अत्यंत प्रकर्षाने जाणवली, हवामानात होणार्‍या अगदी लहान बदलाचे परिणाम सुद्धा हिमालयात राहणार्‍या लोकांच्या जनजीवनावर अत्यंत प्रतिकूल होतो. म्हणून त्यांनी अजून एक मोहीम हाती घेतली आहे. ज्याचा नाव आहे श्रर्ळींश ीळाश्रिू, ीे ींहरीं ेींहशी ारू ीळाश्रिू श्रर्ळींश म्हणजेच साधे जीवन जगा जेणेकरून हिमालया सारख्या दुर्गम भागात राहणारे लोक किमान त्यांचा जीवन जगू शकतील. साध्या राहणीचा हा संदेश जगाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येका पर्यंत पोहोचला पाहिजे याकरिता त्यांची सतत चळवळ असते. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. कधी ते थंड पाण्याने आंघोळ करण्याचा संदेश देण्यासाठी थंडीने गोठलेली सिंधू नदी पोहून पार करतात. तर कधी कमी ऑक्सिजन असलेल्या भूप्रदेशात सुद्धा स्थानिक प्रवासासाठी ते स्वतः कसे सायकल वापरतात याचा उदाहरण देतात. उगाच आवश्यकतेपेक्षा जास्त साहित्यांचा वापर प्रकृतीवर ओझे आहे, हे समजवण्यासाठी ते आपले वर्षानुवर्ष न बदललेले बूट, स्वेटर आणि कपडे लोकांना दाखवतात. आणि या सर्व उपद्व्याप मागे एकाच हेतू की आपणास कळावे कि, माणूस म्हणून आपण या प्रकृती च्या विशाल परिवाराचे केवळ एक सदस्य आहोत, मालक नव्हेत. परिवारात वावरतांना आपुलकी आणि जबाबदारीने वागायला हवे. आपला स्वैराचार कुठेतरी आपल्यालाच जीवघेणा ठरतो आहे. आता त्यांचे व्हिडिओ आपण त्यांचा संदेश ग्रहण करण्यासाठी बघावे, किंवा एखाद्या श्ररीसशी ींहरप श्रळषश हिरो चे धाडस समजून फक्त करमणुकीसाठी बघतो हे आपण स्वतःला विचारायला हवे.

वास्तविक आयुष्यात कुठलेही चांगले काम करण्यासाठी सोनम वांगचुक सारख्या हिरोला कौतुक किंवा पूजनाची गरज नाही, तर गरज आहे त्याच्यासोबत खांद्याला खांदा भिडवून उभे राहण्याची. कारण जरी त्यांनी पुढाकार घेतला असला, ही जबाबदारी आपली सर्वांची सामूहिक आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे, आणि सर्वांना मिळूनच ओढवा लागणार. सोनम वांगचुक चा कौतुक करताना आपण कधीही हे विसरता कामा नये.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा