नवी दिल्ली : चीनला भारताने आणखी एक दणका दिला आहे! केंद्र सरकारने दूरचित्रवाणी संचाच्या (रंगीत टीव्ही) आयातीवर बंदी आणली आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी चीनला मोठा फटका बसणार आहे. यासंदर्भात परदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एक पत्रक काढले आहे. रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली आहे. तसेच, ‘मुक्त’ या श्रेणीतून हटवून ‘प्रतिबंधित’ या श्रेणीत टाकण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. सरकारने ही बंदी 14 इंचाच्या टीव्हीपासून 41 इंच आणि त्यावरील टीव्हीसाठी लागू असणार आहे. चीन आणि व्हिएतनाम व्यतिरिक्त भारत हाँगकाँग, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी आणि थायलंडसारख्या देशांकडूनही रंगीत टीव्ही आयात करतो. 2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7 हजार 120 कोटींच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती. त्यातुलनेत, यंदा घसरण पहायला मिळत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा