विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथल्या ‘हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड’ परिसरात अचानक क्रेन कोसळल्याने अपघात घडला. हजारो किलो वजनाची ही क्रेन अंगावर कोसळल्याने ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही या क्रेनखाली काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओही समोर आला. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, डीसीपी सुरेश बाबू यांनी घटनेबद्दल माहिती देताना क्रेन अपघातात १० जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच मृत्यूचा आकडा ११ वर पोहचल्याची माहिती विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिली. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी १८ मजूर काम करत होते. अपघात घडला त्यावेळी क्रेनच्या सहाय्याने लोडिंगची ट्रायल सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच पर्यटनमंत्री अवंति श्रीनिवासन यांनी अधिकाऱ्यांना तातडीने योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणमच्या जिल्हा आयक्त आणि शहर पोलीस आयुक्तांना क्रेन दुर्घटनेच्या घटनेनंतर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा