पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी कोरोनाचे 913 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 21 हजारी ओलांडली आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 130 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात 21 हजार 193 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सात हजार 889 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात शुक्रवारअखेर 12 हजार 575 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 421 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 325 तर 86 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
शुक्रवारी 4 हजार 383 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 3 हजार 464 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 369 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

पुनावळे, चिंचवड, पिंपरी, भोसरी, निगडी, दापोडी, चाकण, खेड येथील 12 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 24 हजार 78 घरांना भेटी देऊन 79 हजार 970 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून शहरातील रूग्ण संख्या एक हजारच्या आत आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा