पुणे : दीर्घ विश्रांतीनंतर पुणे शहरात शुक्रवारी जोरदार पावसाचे आगमन झाले. पावसाला सुरूवात होताच अवघ्या काही मिनीटात रस्त्यांवरून पाणी वाहत होते. जोरदार पावसामुळे शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले. वाहत्या पाण्यामुळे वाहनांची ये-जा थांबली. विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली. वाहत्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने बहुतांश वाहन चालकांनी वाहने रस्त्यांच्या बाजूला लावली. मध्य वस्तीतील बहुतांश चौकांत पाणी साचले होते. जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा पुणे जलमय झाले.
सकाळपासूनच सर्वत्र ऊन पडले होते. उकाडाही वाढला होता. मात्र दुपारी तीनच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे रस्त्यांवर विविध प्रकारच्या वस्तू, फळे, खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांना साहित्याची आवराआवर करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यांवरील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. तुळशीबाग, मंडई परिसरातही ग्राहकांअभावी शांतता होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा