डॉ. चंद्रशेखर टिळक, डॉ. मोरे, प्रा. जोशी, डॉ. धोंगडे, डॉ. अभ्यंकर साधणार संवाद
पुणे लोकमान्य टिळकांच्या स्मृती दिनानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि लोकमान्य टिळक संशोधन विभागातर्फे आज (शनिवार) आणि रविवारी ऑनलाइन व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानांतून युगपुरूष लोकमान्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. लोकमान्यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. लडाख येथील शिक्षण तज्ज्ञ व संशोधक सोनम वांगचुक यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
आज (शनिवारी) सकाळी 10.30 वाजता सहाय्यक प्राध्यापिका वसुधंरा काशीकर या पुरस्कार आणि सोनम वांगचुक यांच्याविषयी माहिती देतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक 11 ते 11.30 या वेळेत संवाद साधतील. याच वेळी सोनम वांगचुक हे पुरस्काराविषयीच्या भावना व्हिडीओच्याद्वारे व्यक्त करतील. याच वेळी त्यांच्या कार्य व संशोधनासंदर्भातील चित्रफित दाखविली जाईल. लोकमान्यांच्या कार्यावर आधारित ‘तेजोनिधी’ हा माहितीपट तयार करण्यात आला आहे. याची निर्मिती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाने केली आहे. यात लोकमान्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विचारावर भर देण्यात आला आहे. हा माहितीपट 12.15 ते 12.30 या वेळेत दाखविला जाणार आहे. तसेच दुपारी 2 ते 3.30 या वेळेत अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर टिळक हे ‘स्वदेशी अर्थकारण’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानानंतर डॉ. टिळक श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
रविवारी सकाळी 10 ते 10.45 या वेळेत अश्विनी धोंगडे यांचे ‘लोकमान्य टिळकांचे स्त्रीशिक्षण विषयक विचार’ या विषयावर व्याख्यान होईल. 11 ते 12 या वेळेत इतिहास अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे ‘युगनिर्माते टिळक’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारच्या सत्रात 12.15 ते 1.15 या वेळेत प्रा. मिलिंद जोशी यांचे ‘लोकमान्य टिळक आणि मराठी भाषा’ या विषयावर, तर 2 ते 4 या वेळेत डॉ. आदित्य अभ्यंकर यांचे ‘मृगशीर्ष’ या विषयावर व्याख्यान होईल. याच व्याख्यानाने दोन दिवशीय व्याख्यानमालेचा समारोप होईल.

असा पाहता येणार कार्यक्रम
1 ऑगस्ट
JoinZoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89774428301?pwd=NzdONkV6NXROQ1hwRk5wL1Y4YjFiZz09
Meeting ID: 897 7442 8301
Passcode: 308896
2 ऑगस्ट
JoinZoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85840550248?pwd=WW1PZVg1WThGYmNZZS8zQ085Tm5Cdz09
Meeting ID: 858 4055 0248
Passcode: 601350

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा