सौरभ राव यांच्याकडे पदभार

पुणे ः विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे शुकवारी सेवानिवृत्त झाल्याने या पदाची जबाबदारी सौरभ राव यांच्याकडे देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांचे नियोजन डॉ. म्हैसेकर हे करत होते. सद्यपरिस्थितीत या पदावर पुणे आणि परिसराची माहिती असलेल्या अधिकार्‍याची नेमणूक करण्याचे राज्य सरकारने ठरविले. त्यानुसार राव यांची सुमारे 15 दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली. त्यानंतर डॉ. म्हैसेकर यांच्याबरोबरच राव हे दैनंदिन बैठका आणि आढावा घेण्याचे काम करत होते. आजपासून राव हे या पदाचा कार्यभार पाहणार आहेत.
राव यांनी यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेचे आयुक्त आणि साखर आयुक्त या पदांवर काम केले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सुमारे चार वर्षे काम पाहिले. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत ही त्यांच्या कार्यकाळात बांधण्यात आली.
डॉ. म्हैसेकर हे सुमारे दोन वर्षांपासून विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत होते. गेल्यावर्षी झालेल्या महापूराच्या काळात त्यांनी यशस्वीपणे परिस्थिती हाताळली. निवृत्तीनंतर पुण्यातच स्थायिक होणार आहे. तसेच सामाजिक काम सुरू ठेवणार आहे, असे डॉ. म्हैसेकर म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा