सोलापूर : सोलापूर पुन्हा अनलॉक झाल्यानंतर शहरात आता भलतीच वर्दळ वाढली असून नियम न पाळण्याकडे व्यावसायिकांचा कल दिसून येत आहे. विशेषत: खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडत आहे. बरेच चार चाकी गाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते मास्क आणि हातमोजे यांचा वापर करत नसल्याचे दिसते. नागरिक खरेदी करताना याची आग्रही भूमिकाही धरत नसल्याचे दिसते.भाजी विक्रेत्यांच्या बाबतीतही हेच दिसून येत आहे. महापालिका आणि पोलीस अशी संयुक्त कारवाई सुरु असल्याचे सांगितले जातयं मात्र त्यांचा दरारा दिसत नाही.

अनेक नागरीकही मास्क तोंडा ऐवजी गळ्यावर अडकवून फिरताना दिसून येत आहेत. दुचाकीवर दोघेजण फिरणार्‍यांची संख्या वाढत आहे. पोलीसांनी आजही ठिकठिकाणी नाकेबंदी केल्याचं स्पष्ट केलं असलं तरी शहराऐवजी नाक्यांवर पोलीसांची गस्त अधिक आहे. काल एका दिवसात पोलीसांनी ३६९ गुन्हे शहर हद्दीत वाहनचालकांविरुध्द दाखल केले आहेत. सोलापूर शहरात सर्वत्र पाईपलाईन, रस्ते काँक्रीटीकरण ही कामं सुरु झाल्याचे चित्रही पुढे येत आहे. शहरातील वर्दळीचे अनेक प्रमुख रस्ते खेदल्याचं दिसून येत असून गेल्या दोन दिवसात झालेला पाऊस आणि खोदलेल्या रस्त्याचा चिखल यामुळे अनारोग्याची स्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

या सर्वांचा परिणाम मोठी वाहनं चालविणार्‍यांना प्राधान्यानं होत आहे. रस्ते खोदले याबाबतचे निवेदन सविस्तररित्या पालिकेनं प्रसिध्द करावे, पर्यायी रस्तेही जाहीर करावे अशी मागणी वाहन चालकातून आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा