पिंपरी : विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकरकमी शालेय शुल्क वसुलीसाठी तगादा लावणार्‍या १९ खासगी शाळांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.शहरातील एसएनबीपी स्कूल रहाटणी व मोरवाडी, एल्प्रो स्कूल चिंचवड, न्यू पूना पब्लिक स्कूल निगडी प्राधिकरण, बचपन स्कूल दिघी, होली स्कूल पिंपळे सौदागर, आरएमडी स्कूल वाल्हेकरवाडी, साधू वासवानी स्कूल मोशी, ऑर्किड स्कूल निगडी, व्हिग्योर स्कूल पिंपळे सौदागर, विस्डम स्कूल विकासनगर किवळे, सेंट जोसेफ स्कूल विकासनगर किवळे, व्हिब्ग्योर स्कूल चिंचवडगाव, युरो किडस स्कूल चिंचवडगाव, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल वाकड, व्हिब्स स्कूल विकासनगर किवळे, सेंट ऍन्ड्रयूज स्कूल चिंचवड, जयहिंद प्रायमरी स्कूल पिंपरी, डी वाय पाटील पब्लिक स्कूल पिंपरी या शाळांबाबत पालकांनी तक्रारी दिल्या आहेत.

त्यामुळे त्यांना शिक्षण विभागाने नोटीसा दिल्या असल्याचे वृत्त आहे.कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांवर शैक्षणिक शुल्क एकरकमी भरण्याची सक्ती करू नये असे शासनाचे आदेश असताना ते धाब्यावर बसवून या शाळा शुल्क वसुलईसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी पालकवएगाकडून आल्या असल्याने या नोटीसा दिल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून समजते.

शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही. मात्र शैक्षणिक संस्था प्रवेश प्रक्रिया राबवून प्रवेश निश्चित करू लागल्या आहेत. विशेषतः इंग्रजी माध्यमातील ज्यूनिअर के जी, केजी, यासोबतच पहिली ते पाचवीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.

पालकांना फोन करून शाळेत बोलावले जात आहे. तसेच शाळेत येऊन फी भरून तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. नंतर प्रवेश पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. परिणामी तुमच्या पाल्याचे वर्ष फुकट जाईल अशी भीती दाखवली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा