पुणे : कोरानाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीची सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पुणे आणि पिंपरी चिंचवड  महापालिका आयुक्तांना गुरुवारी पाठविले आहे.
 पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहे. मिशन बिगन अगेनअंतर्गत शहरातील व्यवहार पूर्ववत झाले आहेत. खासगी कार्यालवे, उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे नोकरी किंवा अन्य कामासाठी घराबाहेर पडणार्‍या पुणेकरांना सार्वजनिक प्रवासाचे साधन उपलब्ध नाही. परिणामी पुणेकरांचे हाल होत आहेत. अध्यक्ष जगताप यांनीही पुणेकरांची आणि पीएमपीची होणारे हाल लक्षात घेता प्रवासी सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली. 
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 25 मार्चपासून लॉकडाउनमुळे पीएमपीची प्रवासी सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सेवा दिली जात आहे. मात्र, पीएमपीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या ही दहा लाखांच्या घरात आहे. या नागरिकांना प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पीएमपी प्रवाशांकडून मागणी होत आहे.  

…..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा