‘अनलॉक-३’ चे नियम जाहीर

शाळा, महाविद्यालये बंदच

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘अनलॉक-3’ मधील नवे नियम बुधवारी जाहीर केले. नव्या नियमावलीनुसार, शाळा, महाविद्यालये तूर्तास बंदच राहतील. शिवाय, चित्रपटगृहे उघडण्यास बंदी असेल. मेट्रो सेवा बंद राहणार आहे. मात्र, रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे. तसेच, योगा केंद्र आणि व्यायामशाळांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मार्च महिन्यापासून लॉकडाउन लागू करण्यात आला. यामध्ये चित्रपटगृहे, शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मात्र, अनलॉकमध्ये टप्प्या-टप्प्यात काही निर्बंध कमी केले जात आहेत. गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर काल अनलॉक-3 ची नियमावली जारी केली. यामध्ये शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग ३१ ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोबतच, वंदे भारत मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय विमानसेवांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा