नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्या 15 लाखांवर पोहोचली आहे. यापैकी जवळपास 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागच्या चोवीस तासात 48,513 नवे रुग्ण समोर आले. तर, 768 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सलग सहाव्या दिवशी पन्नास हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या 15 लाख 31 हजार 669 इतकी झाली असून, बळींची संख्या 34 हजार 193 वर पोहोचली आहे. देशातील 70 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुुजरातमध्ये आहेत. देशात सुमारे 9 लाख 88 हजार 029 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.50 टक्के इतके आहे. मंगळवारी 4 लाख 8 हजार 855 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 1 कोटी 77 लाख 43 हजार 740 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी 11.86 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या 3 लाख 91 हजार 440 इतकी आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात मागच्या 24 तासांत 7717 रुग्ण समोर आले. याआधी, जवळपास 8 ते 10 हजार रुग्ण आढळत होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा