पुणे : लॉकडाऊनमुळे सुमारे चार महिन्यांपासून बंद असलेले चित्रपटगृह येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात नवीन चित्रपट तयार नाहीत. दिग्दर्शक, निर्माता आणि वितरकांशी चित्रपटगृह चालकांची बोलणी झाली नाहीत. त्यामुळे येत्या शनिवारपासून चित्रपटगृह सुरू करणे अशक्य असल्याचे चित्रपटगृह चालकांनी मंगळवारी सांगितले.

चित्रपगृह सुरू करण्यास शासन परवानगी देणार असल्याची चर्चा आहे. मात्र तशा सुचना केंद्र अथवा राज्य सरकारकडून अद्याप मिळाल्या नाहीत. त्यामुळे चित्रपटगृहाची स्वच्छता झाली नाही. तसेच योग्य अंतर राखण्यासाठी अंतर्गत बदल करून घ्यावा लागणार आहे. चित्रपट नवीन असेल, तरच प्रेषक येतात. कोरोनामुळे चित्रपट तयार करण्याची प्रक्रियाही बंद आहे. त्यामुळे नवीन चित्रपट उपलब्ध होणार नाहीत. चित्रपटगृह सुरू केल्यास जुनेच चित्रपट लावावे लागतील. ते पाहण्यासाठी प्रेषक येणार नाहीत. त्यामुळे चित्रपटगृह चालू करून काहीच उपयोग होणार नसल्याचेही चित्रपटगृह चालकाने नमुद केले.

डिजीटल सिनेमा डिस्ट्रीब्युटर नेटकर्स सोबत करण्यात आलेला करार संपला आहे. त्यामुळे सर्वच चित्रगृह चालकांना नव्याने करार करावा लागणार आहे. चित्रपट पुरविणार्‍या एजंटासोबत चर्चा करावी लागणार आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी पूर्व तयारी चित्रपटगृह चालकाने केली नाही. तसेच शासनाकडूनही अद्याप सुचना आल्या नाहीत. त्यामुळे पुण्यात तरी १ ऑगस्टपासून चित्रपटगृह सुरू करणे अशक्य असल्याचेही चित्रपटगृह चालकांनी सांगितले.
लगेचच चित्रपटगृह सुरू करता येणार नाहीत

चित्रपटगृह सुरू करायचा असेल, तर स्वच्छता करून घ्यावी लागेल. कामगारांना कामावर बोलवावे लागेल. आतील आसनानुसार तिकीटे दिली जातात. मात्र आता अंतर ठेवावे लागणार आहे. त्यामुळे संगणकातील व्यवस्थेतही बदल करून घ्यावा लागेल. खेळ सुरू करताना काय खबरदारी घ्यावी लागेल. याबाबतच्या सुचना शासनाकडून आम्हाला मिळाल्या नाहीत. तसेच चित्रपट वितरकांशी आमची चर्चा नाही. त्यामुळे पूर्व तयारी न करता लगेचच चित्रपटगृह सुरू करता येणार नाहीत.

दिलीप निकम, विजय चित्रमंदिर

अद्याप शासनाकडून सूचना नाहीत

१ ऑगस्टपासून चित्रपटगृह सुरू झाले, तरी त्यावर मर्यादा असणार आहे. आसनाच्या किती टक्के प्रेषकांना शासनाकडून परवानगी मिळेल, हे सांगता येत नाही. प्रेषकांच्या मर्यादेमुळे चित्रपटगृह सुरू करणे परवडणारे नाही. नवीन चित्रपट उपलब्ध नसल्याने प्रेषक लगेचच चित्रपट पाहण्यासाठी येणार नाहीत. लोकांच्या मनात अद्याप कोरोनाविषयी भिती आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच चित्रपटगृह सुरू करण्याचा विचार आहे.

ऋषी चाफळकर, सिटी प्राईड

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा