सोलापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत चाचण्या वाढविणे, आरोग्य विभागाच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्याबरोबरच जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने निराधार, गरीब, गरजू, दिव्यांगांच्या जेवणाचीही काळजी घेतली आहे. दहा दिवसाच्या संचारबंदी काळात सुमारे ३६ हजार १५ अन्नांच्या पाकिटाचे वाटप केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर यांनी दिली. सामाजिक संस्थांनी केलेल्या कामाचे जिल्हाधिकार्‍यांनी कौतुक केले असून त्यांचे आभार मानले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोणताही निराधार, दिव्यांग, बेघर, गरजू व्यक्ती अन्नावाचून उपाशी राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्थांची मदत घेतली. सामाजिक संस्थांनीही ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अन्नांची पाकिटे गरजूपर्यंत पोहोच केली. त्यांना धान्याचा पुरवठा प्रशासनामार्फत करण्यात आला.

शहरातील उद्योगवर्धिनी, संभव फाऊंडेशन, प्रार्थना फाऊंडेशन आणि आस्था रोटी बँकेच्या कम्युनिटी किचनतर्फे स्वयंपाक बनविण्यात येत होता. यातील काही संस्थांनी प्रत्यक्ष अन्न पाकिटांचे वाटपही केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा