सोलापूर : कोरोना महामारीमुळे सर्व डान्स क्लास बंद असल्याने शहर व जिल्ह्यातील नृत्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना तातडीने आर्थिक व अन्नधान्याची मदत करण्यात यावी, अशी मागणी ऑल डान्सर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडॉऊन मुळे सर्वप्रथम मनोरंजन क्षेत्रावर गदा आली. त्यामुळे नृत्य कलेलाही परवानगी नाकारण्यात आली. परिणामी नृत्य क्लासेस बंद असल्याने नृत्य शिक्षक व कलाकार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बनला आहे. तसेच ऑनलाईन नृत्य वर्गाला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शासनाने शहर व जिल्ह्यातील प्रत्येक नृत्य कलाकार व शिक्षकास १५ हजार रुपयांची आर्थिक मदत व अन्नधान्य द्यावे अशी मागणी या निवदेनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर असोसिएशनचे शहराध्यक्ष महेश निकंबे, मयूरेश माणेकश्वर भास्कर आडकी, राज पाटील यूसुफ पीरजादे यांच्या सह्या आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा