पुणे : इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश देण्यासाठी प्रवेश नियंत्रण समितीने प्रवेश प्रक्रियेची तयारी पुर्ण केली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात 301 महाविद्यालयांमध्ये एकूण 1 लाख 5 हजार 732 जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली.
दहावीच्या निकाल जाहीर झाला असून इयत्ता अकरावी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया माहिती होण्यासाठी प्रवेश नियंत्रण समितीकडून काही दिवसांपूर्वी प्रवेश प्रक्रिया नोंदणी करण्याला सुरुवात झाली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा उचलला असून, आतापर्यंत 56 हजार 478 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 301 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 5 हजार 732 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा विज्ञान शाखेत 43 हजार 381 एवढ्या आहेत. त्यामुळे निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असले तरी प्रवेशासाठी पुरेशा जागा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. सध्याच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवेशाचे टप्पे वेळापत्रकात दिल्याप्रमाणे राहणार असल्याचे शेंडकर यांनी सांगितले. दरम्यान अर्जातील भाग दोन भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर होईल.

शाखा – उपलब्ध जागा
कला शाखा – 15 हजार 341
वाणिज्य शाखा – 42 हजार 515
विज्ञान – 43 हजार 381

बायफोकल – 4 हजार 495

अकरावी प्रवेश प्रक्रिया टप्पे

  • अर्जातील भाग क्रमांक एक भरणे – 1 ऑगस्टपासून
  • अर्ज भरून झाल्यावर शुल्क भरायचे आणि अर्ज लॉक करण्याची प्रक्रिया – 1 ऑगस्टपासून
  • विद्यार्थ्याने अर्जात भरलेली माहिती माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करणे – 1 ऑगस्टपासून

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा