पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी कोरोनाचे तब्बल 1 हजार 77 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 19 हजारी ओलांडली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 316 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात 19 हजार 431 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 हजार 142 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात बुधवारअखेर 12 हजार 278 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 393 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 311 तर 82 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
बुधवारी 5 हजार 172 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 3 हजार 999 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 399 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. भोसरी, पिंपरी, दापोडी, चिंचवडगाव, दिघी, खराळवाडी, निगडी, पाषाण, शिरूर येथील 11 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 24 हजार 653 घरांना भेटी देऊन 84 हजार 531 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा