पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 1 हजार 181 नवे रूग्ण आढळले. ही आत्तापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रूग्ण संख्या आहे. लॉकडाऊननंतरही रूग्ण संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 432 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 18 हजार 397 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 हजार 550 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात मंगळवारअखेर 11 हजार 932 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 382 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 303 तर 79 मनपा हद्दीबाहेरील आहेत.

मंगळवारी 5 हजार 667 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 3 हजार 986 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 260 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. सांगवी, कासारवाडी, मोशी, चिंचवड, काळेवाडी, भोसरी, ताथवडे, वाकड, देहूरोड, फुरसुंगी येथील 13 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 24 हजार 852 घरांना भेटी देऊन 1 लाख 14 हजार 26 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा