पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे 21 ऑगस्ट ते 1 सप्टेबर या कालावधीत गणेशोत्सव काळामध्ये संपन्न होणारा 32 वा पुणे फेस्टिव्ह रद्द करण्यात आला आहे. प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिव्ह ‘श्रीं‘ची प्रतिष्ठापना व श्रींचे विसर्जन विधिवत होणार असल्याचे फेस्टिव्हलचे अध्यक्ष व माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
लोकमान्यांच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचला. तीच प्रेरणा घेवून कला-संस्कृती, गायन-वादन, नृत्य, संगीत, क्रीडा यांचा मनोहरी संगम असणार्‍या पुणे फेस्टिव्हलचे आयोजन पुणे फेस्टिव्ह समिती, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारत सरकारचा पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यामाने केले जाते. या फेस्टिव्हलने पुण्याचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर नेले आहे. सलग 10 दिवस आणि सातत्याने 31 वर्षे अखंडित चालू असलेला पुणे फेस्टिव्ह हा देशातील सर्वांत मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. कोरोना संकट संपल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी नव्या उत्सहाने हा महोत्सव साजरा केला जाईल असेही कलमाडी यांनी पत्रात नमुद केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा