पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी नोयडा येथून प्रा. हनीबाबू एम. टी. (वय 54) यांना अटक केली. यात आतापर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. प्रा. हनीबाबू हे दिल्ली विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांच्यावर नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी डाव्या संघटनांकडून एल्गार परिषद आयोजित करण्यात?आली होती. दुसर्‍या दिवशी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांवर हल्ला झाला. त्यामुळे या परिसरात हिंसाचार उफाळला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुणे पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव, सुधा भारद्वाज, वर्णान गोन्साल्विस, अरूण फरेरा, सुधीर ढवळे, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन या नऊ जणांना अटक केली होती. तर, गौतम नवलाखा व प्रा. आनंद तेलतुंबडे या दोघांना न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ते एनआयएसमोर हजर झाले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींच्या घरी छापे टाकले होते. यादरम्यान, प्रा. हनीबाबू यांच्या घरीदेखील 10 सप्टेंबर 2019 रोजी छापा टाकला होता. यावेळी त्यांच्या घरातून लॅपटॉप, पेनडाईव्ह व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा