नवी दिल्ली : येत्या दोन आठवड्यांत कोरोनावरील उपचार आणि लशीबाबत चांगल्या बातमीची घोषणा करण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोनावरील लशीबाबत आमच्याकडे लवकरच खात्रीशीर चांगली माहिती उपलब्ध होणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

मॉडर्ना कंपनीने कोरोना विषाणूविरोधात विकसित केलेल्या लशीची अंतिम टप्प्याची चाचणी अमेरिकेत सुरू होत असतानाच ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. या टप्प्यात 30 हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येणार आहे. मॉडर्ना कंपनी ऑक्सफर्ड विद्यापीठ-अ‍ॅस्ट्राझेनेका आणि दोन अन्य चिनी कंपन्यांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा