पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून शहरात तीन जम्बो रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. तसे आदेश पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या रुग्णालयांसाठी निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

पहिले जम्बो रुग्णालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीईओपी) येथे निश्चित झाले आहे. उर्वरित दोन रुग्णालये सणस ग्राऊंड, बालेवाडी किंवा इतर ठिकाणी उभारीे जाईल. त्यासाठी तांत्रिक तसेच इतर आवश्यक बाबींची तपासणी करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत जागा निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय?आयुक्त विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला तयारीसाठी वेळ मिळाला; परंतु काही कामे निधीअभावी रखडल्याची चर्चा असताना पालकमंत्री पवार यांनी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत अधिकार्‍यांनी झोकून काम करावे अशा सूचना केल्या. ऑगस्टमधील कोरोनाची संभाव्य परिस्थिती पाहता पुढील नियोजन महत्त्वाचे आहे. म्हणून तात्काळ तीन जम्बो रुग्णालये तयार करावीत, असे पवार यांनी सूचित केले. दरम्यान पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रशासनाने कंबर कसली असून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

असे असेल जम्बो रुग्णालय

मोकळ्या जागेत एकाच छत्राखाली कोविड केंद्रासारखे रुग्णालय उभारले जाईल. यामध्ये जवळपास ८०० खाटा असतील. त्यांपैकी ६०० खाटा ऑक्सिजनच्या आणि १४० खाटा हाय डिस्पेन्सी युनिट, ६० खाटा आयसीयू असे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्यविषयक सर्व उपकरणे उपलब्ध असतील. त्यासाठी तज्ज्ञ आरोग्य मंडळी असतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा