अयोध्या : राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी आयोध्या नगरी सज्ज झाली असून या ऐतिहासिक सोहळ्याला मुस्लिमधर्मीयही उपस्थित राहणार आहेत. पाच ऑगस्टला भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्याच दिवसापासून मंदिराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

फाजियाबाद जिल्ह्यातील जमशेद खान यांनी सांगितले की, हिंदू बांधवांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत. आम्ही मुस्लिम असलो तरी भगवान रामावर आमची श्रद्धा आहे. वासी हैदर यांनी सांगितले की, आम्ही इस्लाम धर्मीय असलो तरी भगवान राम हेच आमचे पूर्वज आहेत. राम मंदिर उभारले जात असल्यामुळे आम्हालाही खूप आनंद झाला आहे. शेवट सर्व धर्मांचा सार एकच आहे. त्यामुळे या सोहळ्यात आम्ही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा