पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी कोरोनाचे तब्बल 1 हजार 24 नवे रूग्ण आढळले. ही आत्तापर्यंत दुसर्‍यांदा शहरात कोरोना रूग्ण संख्येने हजारी ओलांडली आहे. रूग्ण संख्या असल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 699 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात 17 हजार 264 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 हजार 451 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात सोमवारअखेर 11 हजार 530 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 369 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 292 तर 77 मनपा हद्दीबाहेरील आहेत.

सोमवारी 4 हजार 909 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 4 हजार 411 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 712 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. सांगवी (पुरुष 75 वर्षे), यमुनानगर (पुरुष 88 वर्षे) पिंपरी (पुरुष 50 वर्षे, 48 वर्षीय), भोसरी (पुरुष 26 वर्षे) मोशी, (पुरुष 94 वर्षे, पुरुष 36 वर्षे) थेरगांव (पुरुष 76 वर्षे) मुळशी (पुरुष 66 वर्षे) येरवडा (स्त्री 48 वर्षे) येथील रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 24 हजार 663 घरांना भेटी देऊन 80 हजार 961 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

दरम्यान, शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी शहरात दुसर्‍यांदा एक हजारच्या पुढे रूग्ण संख्या गेली आहे. वाढती रूग्ण संख्येमुळे महापालिकेसह, खासगी रूग्णालयात बेडची येत्या काही दिवसात कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा