पुणे : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी शहरात पावसाने हजेरी लावली होती. मात्र पुन्हा गुरूवारी शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली. उद्या (शुक्रवारी) मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला. घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात गुरूवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात दिवसभरात पावसाने हजेरी लावली नाही. उद्या (शुक्रवार) पासून येत्या बुधवारपर्यंत रोजच शहरात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. मागील 24 तासात शहरात 1.5 मि.मी. पाऊस पडला. तर 1 जूनपासून कालपर्यंत 264.7 मि.मी. पाऊस पडला आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यासह गोव्यात काही ठिकाणी उद्या (शुक्रवारी) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. मागील 24 तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणातही बर्‍याच ठिकाणी पाऊस पडला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा