पुणे : रेल्वे कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन काळातील पगार न मिळणे, कामगारांना दुय्यम वागणूक देणे, कर्मचार्‍यांना कामावरून काढणे, कामगारांचे सर्व्हिस रेकॉर्ड जाणून बुजून खराब करणार्‍या रेल्वे अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी स्वतंत्र रेल ठेका मजदुर संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मनोज गायकवाड, संघटक संदिप गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक महेश कांबळे, रवी देडे, प्रभु गवली आदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने कंत्राटी कामगारांना पगार न दिल्यास तसेच छोट्या छोट्या कारणावरून त्यांना देण्यात येणारा त्रास न थांबविल्यास लवकरच प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा