नवी दिल्ली: कोरोना विषाणूमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून बरेच जण घरातून काम करत आहेत. सध्या देशात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली असली तरी कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता बऱ्याच कंपन्यांनी खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. अशाच सरकारने ‘वर्क फ्रॉम होम’ बाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

टेलीकॉम विभागाने आयटी आणि आयटीइएस क्षेत्राला या वर्षी डिसेंबरपर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली. या आधी ही मुदत जुलै महिन्यापर्यंत होती आती ती डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

टेलीकॉम विभागाने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयावर आनंद व्यक्त होत आहे. विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी यांनी ट्विट करून सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. सरकारने दिलेल्या या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. सरकारने काम करण्याच्या नव्या पद्धतीला पाठिंबा दिला आहे. यामुळे कामातील गुणवत्ता आणि त्याचे सातत्य वाढवण्यात मदत मिळेल.

आयटी क्षेत्राने सरकारकडे मागणी केली आहे की, कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरातून काम करण्याची परवानगी दिली जावी. जेणेकरून कर्मचारी क्षमतेचा पूर्ण वापर केला जाईल. तसेच रिमोट वर्किंग आणि ऑफिस वर्किंग याचे प्रमाण समान ठेवण्याची मागणी होत आहे.

रविशंकर प्रसाद, टेलीकॉम मंत्रालयाचे सचिव यांचे आयटी क्षेत्राकडून धन्यवाद. यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राहिल, असे नॅसकॉमचे अध्यक्ष देवयानी घोष म्हणाले. कोरोना विषाणू रोखण्यासाठी तसेच त्याच्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून देशातील ४३ लाख आयटी कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के घरातून काम करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा