पुणे ः शहर आणि जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्रीपासून लॉकडाउन करण्यात आलेआहे. तत्पूर्वी ‘तळीरामां’नी शेवटच्या क्षणापर्यंत मद्यविक्रीच्या दुकानांसमोर रांगा लावल्याने एका दिवसात सुमारे 4 लाख लिटर मद्याची विक्री होत राज्याच्या महसुलात केवळ पुण्ण्यातून सुमारे 20 कोटी रुपयांची भर पडली आहे.
लॉकडाउनच्या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार असल्याने सकाळपासूनच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. दररोज विदेशी मद्य हे सुमारे 1 लाख लिटर, तर देशी मद्य हे सुमारे 88 हजार लिटर विक्री होते. मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्याने सोमवारी दुप्पट मद्यविक्री झाली. सुमारे 4 लाख लिटरची विक्री झाली. त्यातून सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाला झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, लॉकडाउन सुरु झाले असून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, तीन कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, 23 ग्रामपंचायती आणि इतर तालुक्यात प्रतिबंधीत असलेल्या क्षेत्रात 23 जुलै पर्यंत म्हणझे दहा दिवसांच्या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनचा कालावधीत वाढविला, तर संबंधित परिसरात मद्यविक्रीची दुकाने बंदच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने ऑनलाइन बुकिंग करून घरपोच मद्य सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन सेवा बंद राहणार असल्याने तळीरामांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा