दिल्ली : जगभरात कोरोना प्रादुर्भाव होत आहे. भारतात आजही कोरोना चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत.कोरोना चाचणीचे हे महागडे दर लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज स्वस्तातील कोरोना टेस्ट किट लाँच केले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे या दोघांनी मिळून आज सगळयात स्वस्तातील कोरोना टेस्ट किट काढले. दिल्ली आयआयटीने या स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती केली आहे.

हे किट न्यूटेक मेडिकल कंपनी बाजारात उपलब्ध करणार आहे. ‘कोरोश्योर’ असे या किटचे नाव आहे.“‘कोरोश्योर’ मुळे देशात कोरोना चाचण्यांच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होईल. चाचण्यांची संख्या आणि किंमत यामध्ये फरक दिसेल. न्यूटेक मेडिकल कंपनी आयआयटी दिल्लीची टेक्नोलॉजी वापरणार आहे. परवडणाऱ्या दरात महिन्याला २० लाख चाचण्या करणे शक्य आहे” असे आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव म्हणाले. या किटला आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा