दिलीप तायडे
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका पुस्तक निर्मितीला बसला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ऑनलाईन शिकवणीचे वर्ग शाळांकडून सुरू करण्यात?आले?आहेत. सध्या अनेक विद्यार्थ्यांना बाजारपेठेत पाठ्यपुस्तके मिळत नाहीत. इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉकडाऊन काळात पुस्तक निर्मिती बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक निर्मितीचे छापखाने सुरू झाले आहेत. मात्र अजूनही राज्यात जिल्हाबंदी असल्याने पुस्तकाची वाहतूक सुरळीत सुरु झाली नाही. त्यामुळे पुस्तक बाजारात पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे पुस्तक विके्रत्यांकडून सांगण्यात आले.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. परीक्षा रद्द करण्यात आल्या. शाळा बंद झाल्या असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे, यासाठी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. मात्र शहरी भागासह, ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे स्मार्ट फोन, इंटरनेटची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पालकांना पुस्तके घेण्यासाठी दुकानांमध्ये फेर्‍या माराव्या लागत आहेत. अनेक दुकानात एक पुस्तक मिळते. तर, काही ठिकाणी पुस्तकेच उपलब्ध नसल्याचे पालकांनी शिक्षणाची व्यथा मांडली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थीदेखील आपल्या गावांकडे गेले आहेत. स्पर्धा परीक्षांच्या नवीन पुस्तकेही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
पुण्यात आणखी दहा दिवस लॉकडाऊन करण्यात आल्याने सध्या तरी पुस्तके मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यंदा ज्या मुलांनी दहावी, बारावीत प्रवेश केला आहे. त्या मुलांच्या पालकांमध्ये आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता सुरू झाली आहे. सीबीएसई, सीआयसीएसई, आयसीएसईच्या बोर्डाची अनेक पुस्तके बाजार पेठेत उपलब्ध नाहीत. तर राज्य बोर्डाची पुस्तके शाळेतून मिळतात. मात्र शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची कोंडी निर्माण झाली आहे.
राज्य सरकारच्यावतीने शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ऑनलाइन उपलब्धही करून देण्यात आली आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध अ‍ॅपवरही लॉकडाऊनच्या काळात मुलांकडून अभ्यास करवून घेतला जात आहे. मात्र अनेकांना इंटरनेटची सुविधा नाही. स्मार्ट फोन नाही, अशा विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय पर्याय नाही. सर्व पुस्तके कधी मिळणार, अभ्यास कसा करायचा असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभे राहिले आहेत, अशी खंत राजेंद्र सोनकर यांनी व्यक्त केली.


साधारण 1 महिन्यापासून ऑलॉनलाईन शिकवणीला सुरूवात झाली आहे. पुस्तक मिळण्या बाबत गोंधळ आहे. एकाच वेळी सर्व पुस्तके उपलब्ध झाली नाही. मुलांचे पुस्तक मिळविण्यासाठी तीन ते चार वेळा अप्पा बळंवत चौकात जावे लागले. मात्र अजूनही पूर्ण पुस्तके मिळाली नाहीत. 
रुपाली धवने-पाटील, पालक


लॉकडाऊनमुळे अप्पा बळवंत चौक पुस्तकांची बाजारपेठालादेखील मोठा फटका बसला आहे. वाहतूक बंद असल्याने पुस्तकांची आवक बंद झाल्याने सर्व विषयांच्या पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती नटराज द बुक शॉपच्या चालकांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा