पुणे: कोरोनाचीबाधा झाल्यामुळे गेल्या सहा दिवसापासून रुग्नालयात असलेले महापौर मुरलीधर मोहळ यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. येत्या 15 जुलैपर्यंत त्यांना घरी राहण्यास सांगण्यात आले आहे.
कोणतीही लक्षणे नसल्यामुळे मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. होम क्वारंटाईन राहण्याची नोटीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि येथील कर्मचार्‍यांचे मी आभार मानतो. होम क्वारंटाईचा कालावधी संपल्यानंतर मी आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असेल अशी माहिती मोहळ यांनी समाज माध्यामातून दिली आहे.
महापौर मोहळ यांना 4 जुलैला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटूंबामधील सदस्य सुध्दा पॉझिटिव्ह आले असल्यामुळे काहींचा रुग्णालयात तर काहींचा घरीच उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा