छगन भुजबळांचा फडणवीसांना चिमटा

पुणे : टीका करणार्‍यांना पवार समजून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. वेळोवेळी पवारांनी राजकारणात अनेकांना गारद केले आहे. शरद पवार हे एक अजब रसायन आहेत. असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. पवारांच्या मुलाखतीची जशी सर्वांना उत्सूकता आहे. तशीच आम्हालाही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्केटयार्डातील निर्सग मंगल कार्यालयात ज्येष्ठ नेत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, पणन व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदि उपस्थित होते. नुकतीच संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा टीजर राऊत यांनी ट्विटरवर टाकला आहे. त्याला ’एक शरद…सगळे गारद’ अशी हेडलाईन दिली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्या टीकेला भुजबळ खास शैलीत प्रत्युत्तर दिले.
’पवारांच्या मुलाखतीची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. टीका करणार्‍या सगळ्यांनाच पवारांनी गारद केले आहे. त्यामुळे ’एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक समर्पकच आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकलेच पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समजाला आरक्षण देणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही ते म्हणाले. नाशिक मालेगावमधील कोरोना रुग्णांच्या संख्येवरून फडणवीस यांनी केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. मालेगावात कोरोनाबाधितांची चांगल्या प्रकारे हाताळणी करण्यात येत आहे. मालेगावातील परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णसंख्या लपवण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी यावेळी संगितले

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा