सहाशे चाळीस नवे रुग्ण

पुणे : पुण्यात बाधितांबरोबर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र एकीकडे मृत्यूंचे सत्र कायम असल्याने प्रशासनापुढे चिंता कायम आहे. मंगळवारी पुन्हा 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 672 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 640 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. शहरात विविध रुग्णालयात 7 हजार 859 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23 हजार 21 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

प्रशासनासमोर मृत्यूंची संख्या थांबविणे मोठे आव्हान ठरत आहे. बाधितांची संख्या रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले. मंगळवारी 640 नवे रुग्ण आढळून आले. तर 672 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. काल 3,467 जणांची स्वॅबची तपासणी करण्यात आली. विविध रुग्णालयात एकूण 7 हजार 859 रुग्ण उपचार घेत आहेत. मागील चोवीस तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल 640 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ससून रुग्णालयात 7, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये 483, तर खासगी रुग्णालयांमध्ये 150 रुग्ण दाखल आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 385 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 63 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 322 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

शहरातील मृतांची संख्या 751 वर पोहोचली असून, आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांना निमोनिया, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आदी विकार त्यांना होते. दिवसभरात एकूण 672 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ते घरी परतले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील 379 रुग्ण, ससून रुग्णालय 10, तर खासगी रुग्णालयांमधील 283 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 14 हजार 411 झाली आहे, तर 7 हजार 859 रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा