पुणे : भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांना विविध संस्था-संघटनांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. काल तिथीनुसार लोकमान्यांची 100वी पुण्यतिथी होती. महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्यास पुणे महापालिकेच्या वतीने उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि केसरी-मराठा संस्थेतर्फे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी केसरीचे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, रौनक रोहित टिळक यांनी पुष्पहार अर्पण केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे सचिव डॉ. अजित खाडिलकर, केसरी परिवारातील प्रदीप खरे, सुमित खरे आदी उपस्थित होते. अनाथ हिंदू महिलाश्रम, लोकमान्य टिळक पुण्यतिथी मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे ज्युदो असोसिएशन,श्री शिवाजी मंदिर संस्था, वसंत व्याख्यानमाला, केसरी- मराठा कामगार युनियन, लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणेश मंडळ (विंचुरकरवाडा), पुणे सार्वजनिक सभा, महाराष्ट्र ब्राह्मण समाज, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, वनिता समाज या संस्थांतर्फे लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात?आले.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त काल दिवसभरात अनेक संस्था, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम झाला. लोकमान्यांना आदरांजली वाहण्यासाठी होणारी सभा कोरोनामुळे झाली नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा