राजगुरुनगर, (वार्ताहर) : खेड तालुक्यात सोमवारी कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरीची संख्या पार केली असून, आता कोरोनाची रुग्णसंख्या १०२ झाली आहे. कडाचीवाडी येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून तालुक्यातील राजगुरुनगर दोन, येलवाडी एक, चाकण दोन, सोळु नऊ, सांडभोरवाडी एक, वडगाव घेनंद एक, चर्‍होली एक, नाणेकरवाडी एक, खराबवाडी तीन, चाकणची राक्षेवाडी तीन असे नवीन कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून तालुक्यातील रुग्णांची संख्या 102 झाली आहे. अशी माहिती खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे व आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. दरम्यान चाकण परिसरात सापडलेल्या 17 पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 49 व्यक्तींचा स्वॅब तपासणी अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

खेड तालुक्यात सोमवार अखेर (दि.29) रोजी तालुक्यातील 102 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तर आतापर्यंत तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीजन्य वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 51 रुग्न कोरोनामुक्त झाले असूनही रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा