समाजाकडून दुर्लक्ष

चाकण, (वार्ताहर) : गेल्या तीन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने लोककलावंतांची उपासमार होऊ लागली आहे. समाजाच्या सर्वच घटकांकडून हे कलावंत दुर्लक्षित झाले असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून कोरोना या भयावह आजाराचे संकट ओढवल्याने राज्यभरातील सुमारे 52 तर पुणे जिल्ह्यातील 13 कलाकेंद्रे लॉकडाऊनमुळे बंद असल्याने तमाम लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे ज्येष्ठ नृत्यांगना व गायिका कमल धोंडराईकर यांनी वार्तालाप करताना सांगितले.

कमल धोंडराईकर म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग त्याचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केल्याने अद्यापही तीन ते साडेतीन महिन्यापासून कलाकेंद्रे बंद आहेत. संगीत पार्टीतील नृत्यांगना व लोककलाकारांना शासनाची मदत मिळाली नाही. या उपेक्षित व दुर्लक्षित लोककलावंतांसाठी शासन दरबारी न्याय मागणारे खूप कमी आहेत. आज रोजी आम्हा कलाकारांची उपासमार होऊ लागल्याने संगीत पार्टीतील प्रत्येक कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिने कलाकेंद्रे बंद असल्याने प्रत्येकी पंचवीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर राज्य व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने मदतनिधी म्हणून जमा करावेत. अशी मागणीही ज्येष्ठ नृत्यांगना व लावणी गायिका कमल धोंडराईकर यांनी केली आहे. लवकरात लवकर पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील कलाकेंद्रे सुरू करावीत. लोककलाकारांची लॉकडाऊनच्या काळात होणारी उपासमार थांबावी. अशी आग्रही मागणी कमल धोंडराईकर यांनी केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा